diwali 
कोल्हापूर

दिवाळीचा बाजार अवघ्या 59 रुपयांत 

अजित झळके

सांगली ः दिवाळी म्हणजे सण उत्साहाचा, आनंदाचा, खरेदीचा... वर्षाचा हा सण. तो आला की हमखास एक मोठी रक्कम बाजूला काढावी लागते. त्यात फराळासाठी किराणा सामानापासून ते फटाके, कपड्यांपर्यंत खरेदीचा धुमधडाकाच असतो. महिन्याचा पगार, बोनस कधी संपतो कळत नाही. पण, हा सारा बाजार अवघ्या 59 रुपयांमध्ये यायचा, असाही एक काळ होता. बरोबर पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1971 साली एका मराठमोळ्या माणसाने दिवाळीसाठी खरेदी केलेल्या साहित्याची यादी सध्या सोशल मिडियातून फिरते आहे. ती वाचली की कळतं, कधीकाळी स्वस्ताई होती. 

15 ऑक्‍टोबर 1971 सालची ही यादी आहे. त्यावर्षी 18 ऑक्‍टोबर रोजी दिवाळी होती. हा बाजार खरेदी करणाऱ्या व्यक्तीला 13 ऑक्‍टोबर रोजी दिवाळीचा ऍडव्हान्स मिळाला होता, अशीही नोंद या चिठ्ठीवर आहे. त्या चिठ्ठीनुसार, शेंगदाणा 9 रुपये किलो, डालडा 3 रुपये अर्धा किलो, गहू 14.50 रुपये किलो, चनाडाळ 1.25 रुपये किलो, तूर डाळ 1.95 रुपये किलो, पोहे 90 पैसे अर्धा किलो, साखर 2 रुपये 10 पैसे किलो, तांदूळ 2.75 रुपये किलो, हमाम साबण 75 पैसे, उदबत्ती पुडा 31 पैसे, रवा 1.25 रुपये किलो होता. याशिवाय, खोबरे, लवंग, बटाटे, खाऊ, फटाके, एसटीचे भाडे या साऱ्याचा समावेश या यादीत आहे. ही सारी बेरीज झालीय अवघी 59 रुपये. 

अर्थात, त्या काळातील ही यादी असल्याने चालू वर्षाशी त्याची तुलना करता येणार नाही, मात्र काही विशेष उत्पादनांचे दर तपासले तर अंदाज येऊ शकेल. सन 1971 साली पेट्रोलचा दर होता 1 रुपये 47 पैसे लिटर. आज तो 88 रुपयांच्या घरात आहे. त्यावर्षी सोन्याचे तोळ्याचे दर होते 193 रुपये, आज तेच 50 हजार रुपयांच्या घरात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT